हृतिकच्या बायकोनं घर सोडलं! Hrithik Roshan`s wife Sussane moves in with her parents

हृतिकच्या बायकोनं घर सोडलं!

हृतिकच्या बायकोनं घर सोडलं!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची बायको सुझन खान यांच्यातलं नातं नेहमीच चांगलं असल्याची चर्चा होती. मात्र आता मागील एक आठवड्यापासून सुझन हृतिकचं घर सोडून आपल्या माहेरी म्हणजेच संजय आणि झरीन खान यांच्या जुहूतल्या बंगल्यात राहतेय.

हृतिक आणि सुझनमध्ये काही वाद झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये पसरलीय. त्यामुळंच आपलं घर सोडून सुझन माहेरी गेलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुझन मागील एक आठवड्यापासून तिच्या आई-वडिलांच्या घरी राहतेय. मात्र तिचे वडील संजय खान आजारी असल्यामुळं त्यांच्यासोबत ती वेळ घालवतेय, असं तिच्या जवळच्या मित्रांकडून सांगण्यात येतंय.

अभिनेता राकेश रोशन यांच्या वाढदिवसाला सुझन तिच्या आईसोबत आली आणि कार्यक्रमानंतर परत माहेरी निघूनही गेली. हृतिक आणि सुझनमध्ये सगळं काही निट आहे. पण ती माहेरी राहायला गेली असल्यामुळं लवकर गेली, असं तिच्या जवळच्या मंडळींकडून सांगण्यात आलंय. शिवाय तिला त्याच दिवशी पॅरिसला जायचं होतं म्हणून ति लवकर निघून गेली, असंही स्पष्ट करण्यात आलं.

हृतिक आणि सुझनमध्ये वाद असल्याची अफवा पसरलीय. त्यामुळं पॅरिसहून परतल्यावर सुझन कुठं राहायला जाते, यावरुन सगळं कळेल. पण त्यांची जोडी कायम राहो, अशी अपेक्षा त्यांचे चाहते व्यक्त करतायेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 11, 2013, 15:31


comments powered by Disqus