हुमा कुरेशीकडून इमरान हाशमीला ‘किस’चे धडे!, huma qureshi teaches emraan hashmi how to kiss

हुमा कुरेशीकडून इमरान हाशमीला ‘किस’चे धडे!

हुमा कुरेशीकडून इमरान हाशमीला ‘किस’चे धडे!

www.24taas.com, मुंबई
बॉलीवुडचा सिरिअल किसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमरान हाशमी आपली सिरिअल किसरची इमेज बदलत असताना किस करणे विसरला आहे.

हो हे खरं आहे. आजकाल बॉलिवुडची हॉट अभिनेत्री हुमा कुरेशी आता इमरान हाशमीला किस करण्याचे धडे देत आहे. इमरान हाशमी आपला आगामी चित्रपट ‘एक थी डायन’मध्ये हुमा कुरेशीला किस करताना दिसणार आहे.

परंतु, या वेळी किस करण्याचे एक्साइटमेंट इमरानपेक्षा हुमा कुरेशीला असल्याचे दिसते आहे. कारण तिने या सिनेमामध्ये इमरानला किस कसे करतात हे शिकवले आहे. विशेष म्हणजे, ‘एक थी डायन’ या चित्रपटात हुमा आणि इमरानचे खूप इंटीमेट सिन्स आहेत.

दोघांनी लिपलॉकही केला आहे. जेव्हा हुमाने ऐकले की, इमरान तीला किस करणार आहे, त्यावेळी ती खूप एक्साइट झाली. हुमा याच्यावर थांबली नाही. किस केल्यानंतर ती म्हटली की, किस करण्यासाठी मला परफेक्ट मॅच मिळाला आहे.
त्यामुळे आता या चित्रपटात दोघांची जबरदस्त केमेस्ट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे.

First Published: Tuesday, March 26, 2013, 20:20


comments powered by Disqus