Last Updated: Thursday, June 12, 2014, 16:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई फारच कमी कालावधीच तरुणांच्या हृद्यात स्थान मिळवणारी आलिया भट आपल्या आगामी सिनेमाचं शूटींग सुरू असताना जखमी झालीय.
आलियाचा आगामी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’च्या सेटवर हा अपघात घडला. पण, कणखर आलियानं जखमी झाल्यानंतरही शूटींग सुरुच ठेवलं. यावेळी, तिला एका गाण्याचं शूटींग पूर्ण करायचं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, आलिया जखमी झाल्याचं दिसताच सेटवर उपस्थित असणाऱ्यांनी तिला हॉस्पीटलमध्ये हलवण्याची तयारी केली. पण, ‘काम पूर्ण झाल्यानंतरच मी हॉस्पीटलमध्ये जाईन’ अशी भूमिका आलियानं घेतली.
त्यानंतर आलिया हॉस्पिटलमध्ये गेली... इथं तिच्या पायाचा एक्स रे काढला गेला. तिच्या स्नायूंना दुखापत झाल्याचं समजलं. त्यानंतर डॉक्टरांनी तिला 10 दिवस आराम करण्यासाठी बजावलंय.
आलियाच्या या दुखापतीमुळे तिचे फॅन्सनाही दु:ख झालंय... त्यांनी तिला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या सिनेमात आलियासोबत वरुण धवनही दिसणार आहे. या सिनेमातील ‘कुडी सॅटरडे सॅटरडे करती रहदीं है... ’ हे गाणं सध्या स्टेज तोड धम्माल करतंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 16:26