Last Updated: Wednesday, June 11, 2014, 17:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलिवूड मधील अभिनेत्री नर्गिस फाखरीचं म्हणणं आहे की, सध्या मी एकटीच आहे. उदय चोप्रासोबत माझे काहीही संबंध नाही असं तिने सांगितलं आहे.
‘’उदय खूप विनोदी व्यक्ती आहे आणि त्याला दुस-याची चेष्टा करायला खूप आवडते. मी या सगळ्याचा विचार करत नाही. माझं नाव नेहमी कोणाकोणा सोबतही जोडले जातं. फक्त मलाच माहीत आहे काय खरं आहे ते. जेव्हा मी वृत्तपत्रात या ट्वीट बद्दल वाचले तेव्हा मला हसू आले. उदय खूप विनोदी आहे. त्याला माहित आहे की तो मला चिडवू शकतो पण याचा माझ्यावर काही फरक पडणार नाही,’’ असं नर्गिसचं म्हणणं आहे.
२०१३ ला रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांची स्पेन मधील बिकनीवरील फोटोने खूप धम्माल उडवली होती. वर्षभर या फोटोवर चर्चा सुरू होती. २०१४ सुरु होताच एक नवीन जोडपं काही अश्याच नवीन गोष्टीसाठी तयार आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 11, 2014, 17:26