Last Updated: Saturday, May 31, 2014, 17:44
www.24taas.com, झी मीडियाअॅक्शन हिरो अक्षय कुमार मराठी चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे. ठण ठण गोपाल या मराठी चित्रपटाच्या मुहुर्तावेळी अक्षय कुमारने ही प्रतिक्रिया दिली आहे.
मी मराठी चित्रपटांचा चाहता आहे. मराठी चित्रपटाची मी निर्मिती केली आहे. आता मराठी चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे उद्गार अभिनेता अक्षय कुमारने काढले.
ओम गणेश प्रॉडक्शन निर्मित "ठण ठण गोपाल` या मराठी चित्रपटाचा मुहूर्त बॉलीवूडचा ऍक्शन हिरो अक्षय कुमार याच्या हस्ते जुहू पार पडला.
या वेळी अक्षय कुमारने उपस्थित सर्वांशी मराठीतूनच संवाद साधला. त्याचे हे मराठी प्रेम पाहून सगळेच जण हरखून गेले. तो म्हणाला, ""मी महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे मराठीबद्दल मला प्रचंड प्रेम आहे.
मराठी भाषा मला समजते आणि बोलताही येते. माझ्या कंपनीने मराठी चित्रपट काढलेला आहे.
मराठीतील बरेच जण माझे मित्रमंडळी आहेत. भविष्यात आणखीन मराठी चित्रपट मी काढणार आहे.
मराठी चित्रपटांचा दर्जा उंचावलेला आहे. मराठी चित्रपट राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेत आहेत.
याचा मला आनंद वाटतो.`` अक्षय कुमारने सगळ्यांना चकित केले. तो येणार आणि काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती. परंतु त्याने मराठी चित्रटात काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 31, 2014, 17:44