Last Updated: Saturday, May 11, 2013, 12:26
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली मेंटल सिनेमा त्याच्या दिग्दर्शकाने म्हणा किंवा त्यातील कलाकारांनी रिलीज होण्याआधीच तो गाजवायचा ठरवला आहे. आता या सलमान खानचचं बघाना, मेंटल चित्रपटावरून दररोज काही तरी खुसपट काढल्याशिवाय त्यालाही चैन पडत नाही.
सोहेल खानही सलमानच्या या मताशी सहमत आहे. त्यामुळे त्यानेही सिनेमाचे शीर्षक बदलण्यासाठी दुजोरा दिला आहे. चला तर मग, या दोन्ही खान बंधूमध्ये एका गोष्टीत तरी साम्य दिसून आले कारण गेल्या वेळेस हा सिनेमा रिलीज होण्यामध्ये दोघा भावांमध्ये चांगलाच वाद झुंपला होता.
आता झालं असं की, आपला दबंग खान मेंटल सिनेमाच्या मेंटल या शीर्षकाने नाखूष आहे.मेंटल हे नाव थोडं विचित्र आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक दुसऱ्या पर्यायावर विचार करत आहे. इतर लोकही त्यांना दुसरी नाव सुचवत आहेत.’ असं सलमान खानने सांगितले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 11, 2013, 12:20