मी ऑनलाईन खरेदीसाठी लालची आहे - करीना कपूर, bought jewellery from my first pay cheque: Kareena

मी ऑनलाईन खरेदीसाठी लालची आहे - करीना कपूर

मी ऑनलाईन खरेदीसाठी लालची आहे - करीना कपूर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मैं अपनी फेव्हरेट हूँ म्हणणाऱ्या करीनानं आता स्वत:बद्दल आणखी एक रहस्य उघड केलंय. घरात आरामात बसलेली असताना मी ऑनलाईन खरेदी करते, तेव्हा गरजेपेक्षा जास्तच वस्तूंची खरेदी माझ्याकडून होते, असं करीनानं म्हटलंय.

सोमवारी मालाबार गोल्डच्या ऑनलाईन स्टोअरच्या उदघाटन प्रसंगी करीनानं ‘मी लालची ऑनलाईन ग्राहक असल्याचं’ म्हटलंय. ती म्हणतेय की, ‘मी इंटरनेटद्वारे खूप गोष्टींची खरेदी करते. कारण यामुळे स्टोअरवर जाण्यासाठी आणि अनेक गोष्टी ‘ट्राय’ करण्यासाठीचा खर्च वाचतो. मला, याचा चांगलाच अनुभव आहे.’ इतकंच नव्हे तर, ‘मी माझ्या पहिल्याच पेमेंट चेकमधून ज्वेलरी खरेदी केली होती’ असं सांगत आपण सोन्याच्या दागिन्यांचेही चाहते आहोत, असं करीनानं दाखवून दिलंय.

ती पुढे म्हणते, की मी पाहिलंय की ‘जेव्हा कधीही मी घरात आरामात ऑनलाईन खरेदी करते, तेव्हा मी खूपच जास्त खरेदी करते. त्यामुळेच कधी-कधी थोडी जास्त खरेदी होऊन जाते. पण मला वाटतं, की हे चांगलंच आहे.’

करीना पुनीत मल्होत्राच्या ‘गोरी तेरे प्यार में...’ या सिनेमात इमरान खानसोबत दिसणार आहे. हा सिनेमा २२ नोव्हेंबर रोजी सिनेमाघरांत प्रदर्शित होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


First Published: Tuesday, October 22, 2013, 16:02


comments powered by Disqus