मी कोणासोबतही रोमान्स करु शकते - प्रियांका चोप्रा, I can Anyone person Romance - Priyanka

मी कोणासोबतही रोमान्स करु शकते - प्रियांका चोप्रा

मी कोणासोबतही रोमान्स करु शकते - प्रियांका चोप्रा
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या चर्चेच आली आहे, ती रोमान्सवरून. तिने बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्य केलं आहे. त्याआधी तिच्या अफेअर्सबाबत वावड्याही होत्या. रणबीर, रणवीर यांच्या सोबत नाव जोडले गेले. त्याआधी शाहरुख खानबरोबरही जोडले गेले होते. त्यामुळे तिला रोमान्सबाबत प्रश्न विचारला गेला असता, मी कोणासोबतही रोमान्स करू शकते, असे बेधडक उत्तर तिने देऊन टाकले.

बॉलिवूडमध्ये अफेअर, रोमान्स, ब्रेक अप हे नवं नाही. कोणाचा रोमान्स कधी सुरु होईल. आणि कधी त्याला ब्रेक लागेल हेही सांगता येत नाही. बिनधास्त अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोप्राचं नाव घेता येईल. मी कोणासोबतही रोमान्स करु शकते, हे माझं काम आहे, असं बोल्ड ब्युटीफूल प्रियंकाने म्हटलं. त्यावेळी उपस्थितांच्या भुवया उंचावल्यात.

प्रियंका चोप्रा लवकरच एक फिल्म अॅवॉर्ड शो होस्ट करणार आहे. तिचा साथीदार हा रणबीर कपूर असणार आहे. या शोबाबत नुकतीच एक पत्रकार परीषद झाली. तू शाहरुखसोबत शो होस्ट का करत नाही, कारण दोघांची जोडी छान वाटते आणि रोमान्स तुमचा चांगला दिसतो, असा थेट प्रश्न तिच्यावर पडला. त्यावर हुशार प्रियंका म्हणाली, फक्त शाहरुखच का, मी कोणासोबतही रोमान्स करु शकते. हे माझं कामच आहे.

प्रियंका आणि शाहरुखमध्ये मध्यंतरी दोघांचं अफेअर असल्याची चर्चा होती. तर त्यांनी डॉन आणि डॉन २ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 10, 2014, 16:37


comments powered by Disqus