“माहित नाही लोक मला गर्विष्ठ का समजतात”- करीनाI do not know why people think I`m arrogant: Kareena

माहित नाही लोक मला गर्विष्ठ का समजतात - करीना

माहित नाही लोक मला गर्विष्ठ का समजतात - करीना
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

अभिनेत्री करीना कपूर खानला उपरती झालीय की तिला सर्व जण मगरूर समजतात. करीना आणि सैफच्या रोमांसच्या बातम्या चर्चेत असतातच मात्र बेबोला लाईम-लाईटपासून दूर राहायला आवडतं.

गेल्या वर्षी ४३ वर्षीय सैफ अली खानसोबत लग्न केलेल्या करीनानं आपली इमेज बनवण्यासाठी कधी प्रयत्नच केले नाही, असं ती म्हणते. ३३ वर्षीय करीना म्हणते, “मला माहित नाही मला लोकं गर्विष्ठ का समजतात. मी अशी व्यक्ती नाही जिनं आपल्या इमेजसाठी कोणता इंटरव्हू दिला असेल. मी जे काही करते त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं मी असं काही केलं नाही. माझं काम बोलायला हवं म्हणून मी लाईम-लाईटपासून दूर राहतो.”

‘अशोका’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चमेली’, ‘ओमकारा’, ‘जब वी मेट’ आणि ‘तलाश’ सारख्या चित्रपटात काम करुन करीनानं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बनवलंय. करीना म्हणाली, अभिनेत्री होणं लहानपणापासून माझं स्वप्न होतं आणि वडील रणधीर कपूर, आई बबीतानं नेहमीच आपल्या निर्णयाचं समर्थन केलं.

करीनाचा ‘गोरी तेरे प्यार में’ हा आगामी सिनेमा आहे. ती सिनेमाबाबत खूप उत्साहित आहे. इमरान खान सोबत तिचा हा दुसरा सिनेमा आहे. इमरान-करीना स्टारर हा सिनेमा २२ नोव्हेंबरला रिलीज होतोय. आपल्या करिअरमध्ये फॉर्ममध्ये असतांना करीनानं लग्न केलं... लग्नाचा अर्थ तडजोड करणं होत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013, 21:51


comments powered by Disqus