‘मला कोणालाच काही दाखवायचं नाही’ - सोनाक्षी, I do not show anything - Sonakshi

मला कोणालाच काही दाखवायचं नाही - सोनाक्षी

मला कोणालाच काही दाखवायचं नाही - सोनाक्षी
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

“मला कोणापुढं काहीही सिद्ध करायचं नाहीय. मी काही सिद्ध करायला चित्रपट करत नाही” हे म्हणणं आहे आतापर्यंत जास्त पुरुष प्रधान सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं.

मला काही सिद्ध करण्याची गरज नाही, माझ्या अभिनयाबाबत आतापर्यंत कोणीही मला नावं ठेवली नाहीत. माझ्या पहिल्या सिनेमातही माझ्या कामाचं कौतूक झालं होतं. मी चांगला अभिनय आणि नृत्य करते, त्यामुळं मला वेगळं काही करण्याची गरज नाही, असंही सोनाक्षीला वाटतं.

‘दबंग’ चित्रपटातून सलमान खानसोबत सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल ठेवलं. नंतर अक्षय कुमार सोबत ‘रावडी राठोड’ आणि अजय देवगण सोबत ‘सन ऑफ सरदार’ सारखे हीट सिनेमे तिनं दिलेत. मसाला आणि एंटरटेन्मेंटनं भरपूर असलेले सिनेमे मला करायला आणि बघायला, या २६ वर्षीय अभिनेत्रीला आवडतं.

सोनाक्षी सध्या येत्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मिलन लूथरियाद्वारं दिग्दर्शित या रोमँटिंक ड्रामा असलेल्या चित्रपटात सोनाक्षी पुन्हा एकदा अक्षय कुमार सोबत दिसतेय. याआधी ‘रावडी राठोड’ आणि ‘जोकर’ सिनेमात तिनं अक्षय सोबत काम केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013, 15:29


comments powered by Disqus