मला `किंग ऑफ रोमांस` नाही `बादशाह` म्हणा- एसआरके I don`t like King of Romance tag- SRK

मला `किंग ऑफ रोमांस` नाही `बादशाह` म्हणा- एसआरके

मला `किंग ऑफ रोमांस` नाही `बादशाह` म्हणा- एसआरके
www.24taas.com, मुंबई

शाहरुख खानने केलेल्या रोमँटिक सिनेमांनी त्याला सुपरस्टार बनवलं. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, वीर जारा यांसारख्या रोमँटिक सिनेमांमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला ‘किंग ऑफ रोमांस’चा किताब दिला. मात्र स्वतः शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमांस’ म्हणवून घेणं पसंत नाही.

१९९२ साली शाहरुखने ‘दिवाना’ या सिनेमातून आपल्या फिल्ममधील कारकीर्दीला सुरूवात करणाऱ्या शाहरुख खानने नंतर डर, बाजीगर, अंजाम या सिनेमांमध्ये खलनायकी भूमिकाही केल्या होत्या. मात्र १९९५साली आलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमातून शाहरूख खानची रोमँटिक हिरोची प्रतिमा बनली. नुकताच शाहरुख ४७ वर्षांचा झाला. शाहरुखचं म्हणंय की त्याने एक अभिनेता म्हणून तो बरीच विविधता देऊ शकतो.

“मला माहित आहे की तरुण मुलींना मी रोमँटिक भूमिकांमध्ये जास्त भावतो. त्यांच्या मतांचाही मी आदर करतो. पण मला किंग ऑफ रोमांस म्हणण्याऐवजी बादशाह म्हणवून घ्यायला जास्त आवडेल. मला इंडस्ट्रीत येऊन आता २१ वर्षं झाली आहेत, या २१ वर्षांत मी ७५ सिनेमे केले आहेत.” असं शाहरुख म्हणाला.

शाहरुख म्हणाला, “मला किंग ऑफ रोमांस म्हटलेलं आवडत नाही. डॉनची भूमिका करताना मला विशेष आनंद झाला होता. माय नेम इज खानमधील माझी भूमिकाही मला खूप आवडली. मला लोकांनी एक अभिनेता म्हणून ओळखावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वदेस, चक दे इंडिया, माय नेम इज खान अशा सिनेमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मी फक्त रोमँटिक हिरो नाही.”

First Published: Wednesday, November 7, 2012, 16:08


comments powered by Disqus