`करवाचौथ` आणि सैफसाठी... ना बाबा ना!, I don`t need to starve to prove my love for Saif: Kareena Kapoor

`करवाचौथ` आणि सैफसाठी... ना बाबा ना!

<B> `करवाचौथ` आणि सैफसाठी... ना बाबा ना! </b>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर-खान हिनं तिचा पती सैफ अली खान याच्यासाठी ‘करवाचौथ का व्रत’ न करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या नवऱ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी उपाशी राहण्याची काही एक गरज नाही, असं ठाम मत तिनं व्यक्त केलंय.

गेल्याच वर्षी करीना कपूर आणि सैफ अली खान विवाहबंधनात अडकले होते. करीना म्हणते, ‘माझ्या नवऱ्यावर माझं किती प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी मला उपाशी राहण्याची काही एक गरज नाही. त्यामुळे मी काही ‘करवाचौथ’चं व्रत करणार नाही. मी कपूर आहे. खाण्याविना मी राहूच शकत नाही. मी हा दिवस खाऊन, काम करून आणि आपल्या सिनेमाचा प्रचार करून साजरा करणार आहे’.

‘मालाबार गोल्ड अॅन्ड डायमंड’ची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर असलेल्या करीनानं आज मुंबईत एका ऑनलाईन स्टोअरचं उदघाटन केलं. त्यावेळी ती बोलत होती.

यावेळी, करीनानं ऑनलाईन खरेदीमुळे आपला खूप सारा वेळ वाचत असल्याचंही म्हटलंय. ‘माझ्या मेहनतीच्या कमाईनं मी जे काही दागिने खरेदी करते, ते माझ्यासाठी खास असतात. सोनं आणि हिरे दागिन्यांमध्ये सगळ्यात मस्त फॅशन स्टेटमेंट आहे’ असं करीना म्हणतेय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, October 21, 2013, 15:51


comments powered by Disqus