पुन्हा प्रेमभंग नको - दीपिका पादूकोण, i feel complete when i am in a relationship, says deepika padu

पुन्हा प्रेमभंग नको - दीपिका पादूकोण

पुन्हा प्रेमभंग नको - दीपिका पादूकोण

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अभिनेत्री दीपिका पादूकोन आपल्या प्रेमसंबंधांबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करताना दिसते... पण, पहिल्यांदाच तिनं आपल्या जीवनात प्रेमाला अत्यंत महत्त्व असल्याची जाहीर कबुली दिलीय.

दीपिका म्हणते, मी केवळ माझ्या नातेसंबंधांबद्दल नाही तर सिनेमे निवडतानाही केवळ माझ्या मनाला पटतील तेच निर्णय घेते. माझ्यासाठी कुणावर तरी प्रेम करणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. मला वाटतं की अशा कित्येक स्त्रियांच्यावतीनं बोलतेय ज्यांना कुणासोबत प्रेमसंबंध असल्यावर स्वत:मध्ये पूर्णत्वाचा भास होतो.

`इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह`मध्ये बोलताना शनिवारी दीपिकानं आपली ही भावना बोलून दाखवलीय. `परंतु, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे संबंध अतिशय सुंदर असायला हवेत`, असंही तिन पुढे म्हटलंय. रणवीर सिंहसोबत असलेल्या तिच्या संबंधांबद्दल तिला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, `माझ्यासारख्या एखाद्या तरुण मुलीला एखाद्याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मला माझा पुन्हा एकदा प्रेमभंग नाही होऊ द्यायचा. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहत असाल तर अगोदर तुम्ही त्याच्याबद्दल विश्वास ठेवणं गरजेचं आहे` असंही दीपिकानं म्हटलंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 9, 2014, 08:13


comments powered by Disqus