Last Updated: Saturday, February 16, 2013, 23:37
www.24taas.com, मुंबईशांतीसारख्या सिरीयलमधली शांतीची भुमिका गाजवलेली अभिनेत्री मंदिरा बेदी तीच्या सोशल लाईफमध्येही तितकीच जागरुक आहे हे याची झलक नुकतीच पाहायला मिळाली.. मंदिरा बेदी नेहमीच सामाजिक भान असलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते...
म्हणूनच कि काय एका खाजगी कंपनीनं त्यांच्या मुलींसाठीच्या एका स्कॉलरशिप प्रोजेक्टसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून तीला निवडलं. त्यासाठी आयोजीत एका कार्यक्रमावेळी समाजातल्या विकास करू पाहणा-या मुलींना प्रोत्साहीत करण्याची गरज मंदिरानं व्यक्त केली.
तर शहरी आणि ग्रामीण भागातल्या मुलींच्या स्वप्नांना बळ देणा-या अनोख्या प्रयत्नाची खासीयत देखील तीनं उलगडून सांगितली आणि मुलगी असल्याचा अभिमान आपल्या आई-वडीलांमुळे वाटत असल्याचं तिनं आवर्जून सांगितलं नेहमीच काहीतरी वेगळं करू पाहणा-या मंदिराचं हे पाऊलही निश्चितच कौतुकास्पद आहे असंच म्हणावंसं वाटतं.
First Published: Saturday, February 16, 2013, 23:13