Last Updated: Sunday, August 11, 2013, 11:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई‘स्टुडंट ऑफ द ईयर’ सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या आलिया भट्टने आपले बोल्ड अंदाज दाखवायला सुरूवात केली आहे. एकीकडे ती अर्जुन कपूरसोबत रोमांस करताना दिसते, तर दुसरीकडे ती वरुण धवनसोबतही दिसून येते.
नेमकी आलिया कुणासोबत डेटिंग करतेय, असा प्रश्न विचारल्यावर आलियाने त्याचं खरं उत्तर दिलं नाहीच. पण या उलट तिने जी प्रतिक्रिया दिली, ती तिचा बोल्डनेस दाखवण्यासाठी पुरेशी होती. आपण महेश भट्टची मुलगी असल्याचं आलियाने दाखवून दिलं. आलिया म्हणाली, “मी काही कुणी संत नाहीये. शाळेत असतानाच माझे दोन दोन बॉयफ्रेंड्स होते. पण सध्या माझं लक्ष करीअरकडे आहे. त्यामुळे इतक्यात तरी मी कुणाच्या प्रेमात पडणार नाही.”
शाळेतल्या दिवसांपासूनच आपले दोन दोन बॉयफ्रेंड्स असल्याचं विधान करून आलियाने खळबळ उडवून दिली आहे. अशा विधानांनी चर्चेत राहाणंही आलियाला चांगलं जमतंय. त्यामुळेच शाळेतल्या सवयीनुसार सध्याही आलिया अर्जुन आणि वरुण दोघांसोबत फिरत असते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 11, 2013, 11:36