पाच वर्षे आई होण्याची इच्छा नाही - करिना I have no interest in being a mother: Kareena Kapoor

पाच वर्षे आई होण्याची इच्छा नाही - करिना

पाच वर्षे आई होण्याची इच्छा नाही - करिना

<><>
करिना एका कार्यक्रमात साडी नेसून आल्यानंतर, मनोरंजन जगतातील पत्रकारांनी कुजबूज सुरू केली. मात्र आपली आणखी पाच वर्षे आई होण्याची इच्छा नसल्याचं करिना कपूरने बोलून दाखवलं, तसेच सैफलाही हे मनापासून मान्य असल्याचं तिने सर्वांना सांगितलं.

खरं म्हणजे करिना जेव्हा या वर्षी कोणत्याही अवॉर्ड समारोहात दिसत नव्हती, यावरून ही चर्चा सुरू झाली, मात्र पैसे मिळाले तरंच मी एखाद्या कार्यक्रमात परफॉर्म करते असं करिनाने बोलून दाखवलं.

इतक्यात आई होण्याचा आपला विचार नाही हे स्पष्ट करण्यासाठी करिनाने आपली सिंघम २ च्या शुटिंगसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं सांगितलं. २०१४ मध्ये येणाऱ्या या सिंघम २ साठी आपण यापेक्षा अधिक फीट असणार असल्याचं यावेळी करिनाने बोलून दाखवलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 30, 2014, 17:57


comments powered by Disqus