मला उंच मुली आवडतात - आमीर खान, I love tall women: Aamir Khan

मला उंच मुली आवडतात - आमीर खान

मला उंच मुली आवडतात - आमीर खान

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आमिर स्वत: उंच नाही मात्र, त्याला उंच मुली खूप आवडतात... आणि हे गुपित आमिरनंच मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात सांगितलंय.

‘धूम-३’ या सिनेमात आमिर सुंदर आणि उंच कतरीनासोबत काम करताना दिसणार आहे. राज फिल्म निर्मित धूम३ लॉन्च करताना ‘धूम-३’मधील कॅटची प्रतिकृती असणारी ‘बार्बी डॉल्स’ लिमीटेड एडिशनसह सादर केली. बार्बी डॉलची ब्रँड अॅम्बेसिडर असणारी आणि बार्बीसारख्या दिसणाऱ्या कैटला पाहून, ‘मला उंच मुली खूप आवडतात. आणि त्यांच्या सोबत रोमान्स करताना त्यांची उंची मार्गात अडथळा ठरत नाहीत’ असं आमिरनं आपल्या मिश्किल शैलीत म्हटलंय.

‘हिल्स मी कधीतरी वापरते , भूमिकेची गरज असेल तरचं मी हिल्सचा वापर करते अन्यथा नाही’ असं म्हणत कतरिनानंही आमीरला साथ दिलीय.

‘बॉलीवूडमध्ये बदल होताना मी पाहिलेत आणि ते बदल मला आवडतात... आजकाल महिलाकेंद्रीत भूमिका असलेले अनेक सिनेमे निर्माण होत आहेत’ असंही यावेळी कॅटनं म्हटलंय.

सध्या, महिला केंद्रीत सिनेमांच्या यादीत देढ इश्किया, गुलाब गँग आणि मेरी कोम या सिनेमांचाही सामावेश आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 20, 2013, 18:30


comments powered by Disqus