Last Updated: Tuesday, February 19, 2013, 18:10
www.24taas.com, मुंबईअभिनेता जॉन अब्राहम आपल्या नव्या ‘आय, मी और मैं’ या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदासोबत काही हॉट सीनमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जॉन एक नाही दोन ललनांसह रोमान्स करताना दिसणार आहे.
जॉन या चित्रपटात इशान सबरवाल या भूमिकेत दिसणार आहे. चित्रांगदा सिंह आणि प्राची देसाईसोबत गुटरगूँ करताना दिसणार आहे.
‘आय, मी और मैं’ हा चित्रपट जॉन अब्राहम, गोल्डी बहल आणि सृष्टी आर्या यांची निर्मिती आहे. जॉन सोबत चित्रांगदा सिंह, प्राची देसाई लीड रोलमध्ये दिसणार आहे. कपिल शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकने सर्वांनी प्रभावित केले आहे. येत्या १ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
First Published: Tuesday, February 19, 2013, 17:45