Last Updated: Sunday, March 30, 2014, 10:55
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूड बादशाहा शाहरुख खाननं ट्वीट केलंय की, त्याला आई-वडीलांची आठवण येतेय. आम्ही सर्वजण सेटवर आई-वडीलांच्या आठवणींनीबद्दल बोलत होतो. मला शूटवरुन घरी जाताना आई-वडीलांची आठवण येते. माझ्या पालकांचं खूपच लवकर निधन झालं असं शाहरुखनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
शाहरुख फक्त १५ वर्षांचा असताना त्यांच्या वडीलांचं कर्करोगानं निधन झालं. १९९०मध्ये शाहरुखच्या आईचं प्रर्दीघ आजारानं निधन झालं त्यावेळी शाहरुखनं इंडस्ट्रीमध्ये चागंलचं नाव कमावलं होतं.
चेन्नई एक्सप्रेसचा स्टार पत्नी गौरीसह तीन मुलं आर्यन, सुहाना आणि अब्राम यांच्यासोबत मुंबईमध्ये `जन्नत` बंगल्यात राहतोय. सध्या शाहरुख चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. फराह खान निर्मित `हॅपी न्यू इअर` या चित्रपटात शाहरुख अभिेषेक बच्चन, सोनू सूद, बोमन ईरानी, विवान शाह आणि दीपिका पादुकोण सोबत दिसणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 30, 2014, 10:52