आलियाने कॉफी विथ करनमध्ये उघड केली गुपीतं!, I started dating in sixth standard: Alia Bhatt

आलियाने कॉफी विथ करनमध्ये उघड केलीत गुपीतं!

आलियाने कॉफी विथ करनमध्ये उघड केलीत गुपीतं!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवुड अभिनेत्री आलिया भट्टसाठी वयाचे काही घेणे देणे नाही. करन जोहर यांच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलियाने कॉफी विथ करन या कार्यक्रमात अनेक गुपीतं उघड केली. जी ऐकल्यावर तुम्ही हैराण व्हाल.

आलियाने सर्वात पहिले गुपीत उघड केलं ते म्हणजे तीने सहावीत असतानाच डेटिंग सुरू केलं होतं. ती म्हणाली, सहावीत असताना डेटिंग सुरू केलं होतं, पण ते रिलेशन हार्मलेस आणि इनोसंट होतं. आलियानुसार ती तथाकथित डेटिंग नव्हती. आम्ही वर्गात एकमेकांना पाहून गालातल्य गालात हसत असत.

त्यानंतर दुसरे गुपीत म्हणजे ऑफिशिएली १० असताना मला एक बॉयफ्रेंड होता, असे सांगत आलिया म्हणाली, तो खूप चांगला मुलगा होता. पण त्यांने नंतर मला सोडून दिले.

शोमध्य आलिया ही शैला खानने डिझाइन केलेल्या गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. रविवारी टेलिकास्ट होणाऱ्या या एपिसोडमध्ये स्टुटंड ऑफ द इअरचे सहकार सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवनही होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 27, 2013, 17:46


comments powered by Disqus