`ओरल सेक्स`मुळे मला झाला कँसर- मायकल डग्लस I suffered from cancer due to Oral sex - Duglas

`ओरल सेक्स`मुळे मला झाला कँसर- मायकल डग्लस

`ओरल सेक्स`मुळे मला झाला कँसर- मायकल डग्लस
www.24taas.com, झी मीडिया, सॅन फ्रान्सिस्को

हॉलिवूडचा हॉट हंक असणाऱ्या मायकल डग्लसचं म्हणणं आहे की त्याला झालेल्या घशाच्या कँसरचं कारण मद्यापान किंवा धूम्रपान नसून ‘ओरल सेक्स’ हे आहे. मायकल डग्लसचं हे वक्तव्य चांगलंच खळबळजनक ठरलं आहे.

२०१० साली मायकल डग्लसला कँसर झाल्याचं पहिल्यांदा समजलं. दारू आणि सिगारेटच्या व्यसनामुळे त्याला घशाचा कँसर झाल्याचं म्हटलं जात होतं. द गार्डियन या वृत्तपत्राला त्याने दिलेल्या मुलाखतीत मात्र त्याने चांगलंच धक्कादायक वक्तव्य केलं. तणावपूर्ण आयुष्यामुळे आपल्याला कँसर झाला असावा, असं मला वाटत होतं. मात्र ओरल सेक्समुळे मला कँसर झाला असून तो थेट चौथ्या पायरीवर गेला, असं मायकल डग्लसने म्हटलं.

ओरल सेक्समुळे HPV चे विषाणु तोंडात जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. हे विषाणुच कँसरला जबाबदार ठरले. मद्यपान आणि धूम्रपानाच्या सवयीबद्दल पश्चात्ताप होतो का? असा प्रश्न विचारल्यावर त्याने आपल्या कँसरचं कारण धूम्रपान किंवा मद्यपान यांसारखी व्यसनं नसून ओरल सेक्स असल्याचं सांगितलं. “या संदर्भात अधिक माहिती न देता मी एवढंच स्पष्ट करतो, की ओरल सेक्समुळे तोंडात HPV विषाणुंचं संक्रमण होऊन मला मला कँसर झाला.” डग्लसला आठ आठवडे किमोथेरपी आणि रेडिएशन या सारख्या गोष्टींचा आधार घ्यावा लागला. गेल्या दोन वर्षांपासून मायकल डग्लस कँसरमुक्त आयुष्य जगत आहे. मात्र दर सहा महिन्यांनी त्याला सर्व चाचण्या कराव्या लागतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 4, 2013, 16:19


comments powered by Disqus