अनिल कपूची मुलगी म्हणते बाबांची प्रसिद्धी नको!, I want to create my own identity: Sonam

अनिल कपूची मुलगी म्हणते बाबांची प्रसिद्धी नको!

अनिल कपूची मुलगी म्हणते बाबांची प्रसिद्धी नको!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मी माझी ओळख निर्माण करीन. मला बाबा (अनिल कपूर) यांची प्रसिद्धी नकोय. माझी मी स्वत: ओळख बॉलिवूडमध्ये करीन, असा दावा अभिनेत्री सोनम कपूर हिने केला आहे.

मला वडील अनिल कपूर यांच्या यशाचा फायदा उठवायचा नाही. मी बॉलिवूडमध्ये माझी स्वत:ची ओळख तयार करेन. मी कोणाच्या ओळखीचा लाभ उठवू शकत नाही. माझी ओळख बनविण्यासाठी लक्ष केंद्रीत करीत आहे. यात मी यशस्वी होईन, असे सोनम सांगते.


सोनम कपूर ही अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची मुलगी आहे. तर चित्रपट निर्माता सुरिंदर कपूर यांची नात आहे. तर निर्मात बोनी कपूर, अभितेता संजय कपूर आणि संदीप मारवाह यांची ती भाची आहे. त्यामुळे तिला वारसा हक्काने बॉलिवूडमध्ये पाऊस ठेवायला मिळाले आहे. असे असले तरी तिने आपण आपली ओळख निर्माण करण्याचे बोलून दाखविले आहे.

सोनम कपूर ब्लॅक (२००५)मध्ये सहाय्यक म्हणून भूमिका साकारली होती तर सांवरिया (२००७)मध्ये ती मुख्य भूमिकेत होती. सांवरियाने तिला खरी ओळख दिली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 13, 2013, 16:40


comments powered by Disqus