रामगोपाल वर्माचे डोके फिरले, केला महिलांचा अपमान, I Wanted To Marry Ram Gopal Varma - Suchitra Krish

रामगोपाल वर्माचे डोके फिरले, केला महिलांचा अपमान

रामगोपाल वर्माचे डोके फिरले, केला महिलांचा अपमान
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

डिरेक्टर रामगोपाल वर्माने स्त्रियांविषयी एक धक्कादायक वक्तव्य केल्याचं उघड झालंय. अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमुर्तीने लग्नाचं प्रपोज केल्यानंतर रामूने अत्यंत धक्कादाक उत्तर दिलंय, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. काय आहे हा सगळा प्रकार पाहूया.

'मी लग्न करणाऱ्यांसारखा नाही. मी स्त्रियांना फक्त संभोगासाठी वापरतो, आणि मला खात्री आहे की तसे तुला वाटत नाही...' असे आश्चर्यकारक उत्तर दिले होते दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने.

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने लिहिलेल्या 'ड्रामा क्वीन' या पुस्तकाचे काल (सोमवारी) प्रकाशन करण्यात आले. त्यामध्ये सुचित्राने 'रामू'बद्दल एक प्रकरण लिहिले आहे. तिने 'रामू'ला लग्नाची मागणी घातल्यावर तिला रामूकडून धक्कादायक प्रतिसाद मिळाला होता, असा दावा सुचित्राने केला आहे.

सुचित्रा, मला वाटते तुझा माझ्याबद्दल गैरसमज झालाय. आपण अजिबात एकसारखे नाही. माझा विवाहसंस्थेवर विश्वास नाही. मला स्त्रियांचे शरीर आवडते. माझ्या मते, महिलांना पाहिले जावे, त्यांना ऐकू नये, अभिनेत्री सुचित्राने दिग्दर्शक राम गोपाल वर्माबद्दल केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 20, 2013, 09:42


comments powered by Disqus