Last Updated: Thursday, September 12, 2013, 23:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईरमझानमधील इफ्तार पार्टीत सलमान आणि शाहरुखने एकमेकांना आलिंगन दिलं, तेव्हा त्यांच्यातील वाद मिटल्या आहेत, असं वाटलं होतं. मात्र बॉलिवूडचा किंग होण्याच्या बाबतीत दोघंही एकमेकांचे वैरीच आहेत, हे सलमान खानने आपल्या बोलण्यातून पुन्हा दाखवून दिलं.
बिग बॉस ७च्या पत्रकार परिषदेत सलमान खानने शाहरुखबद्दल बोलताना म्हटलं, “मी जुने वाद विसरून त्या दिवशी शाहरुखला मिठी मारली, कारण तो रमझानचा पवित्र महिना होता. त्या दिवशी मीच नाही, तर इतरांनीही आपल्यातील वाद विसरून शत्रूशी मैत्री करावी.”
शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेस सिनेमाने सलमान खानचे सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स तोडत २२५.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या गोष्टीने आपल्याला काही फरक पडत नसल्याचं सलमान खानने म्हटलं आहे.
“माझं शाहरुख खानशी कुठलंही वैर नाही. मात्र जर मला कुणाला हरवायचं असेल, तर मी माझ्या कामातूनच हारवीन. माझा आगामी सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड्स मोडेल. मग तो आमिर खानचा ‘धूम ३’ असो नाहीतर रणबीरचा आगामी सिनेमा असो... ” अशा शब्दांत सलमान खानने सर्व अभिनेत्यांना आव्हान दिलं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, September 12, 2013, 23:11