अलियाना शाहीद कपूरवर फिदा!, illeana crazy on shahid kapoor

अलियाना शाहीद कपूरवर फिदा!

अलियाना शाहीद कपूरवर फिदा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘फटा पोस्टर निकला हीरो’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अलियाना डीक्रूज चॉकलेट बॉय शाहीद कपूरच्या चेहऱ्यावर फिदा झालीय. ‘फटा पोस्टर निकला हीरो’ या चित्रपटात अलियाना पहिल्यांदाच शाहीदसोबत काम करणार आहे.

शाहीद कपूर या चित्रपटात एका चॉकलेट बॉयसारखा भोळसट अशा मुलाच्या भूमिकेत आहे. त्याची ही भूमिका खूप फायदेशीर ठरेल. मोठ्या पडद्यावर शाहीद आणि अलियानाची जोडी खूप चांगली वाटेल, असं आलियानानं म्हटलंय. अलियाना म्हणते की, “ही जोडी नवीन असल्यानं मोठ्या पडद्यावर खूप यशस्वी ठरणार आहे. या चित्रपटात शाहीदची भूमिका छाप पाडणारी आहे. त्याची ही भूमिका या चित्रपटासाठी खूप महत्त्वाची आहे.”

या चित्रपटात हास्यांस्पद अशी अनेक दृष्य आहेत. त्याचसोबत काही अॅक्शन सीन तर रोमान्स देखील आहे. त्यामुळं हा चित्रपट नक्कीच यशस्वी ठरेल, असं अलियानाला वाटतंय. अलियाना याआधी ‘बर्फी’ या चित्रपटात सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘फटा पोस्टर निकला हीरो’ हा तिचा दुसरा चित्रपट आहे.

राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला ‘फटा पोस्टर निकला हीरो’ या चित्रपटात शाहीद अभिनेता विश्वास रावच्या तर अलियाना सामाजिक कार्यकर्ता काजोलच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 10, 2013, 19:03


comments powered by Disqus