Last Updated: Saturday, November 24, 2012, 19:52
www.24taas.com, मुंबई बॉलिवूडला तिनही ‘खान’चा बोलबाला आता नेहमीचाच झालाय. यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील मनमुटावाच्या चर्चाही जोरदार रंगवल्या जातात. पण, तिसरा खान मात्र या आपल्या दोन स्पर्धक ‘खान’ बरोबर अगदी आपल्या पद्धतीनं समीकरण बनवतो... आणि तो खान म्हणजे आमिर खान...
आमिरचा ‘तलाश’ हा येत्या काही दिवसांतच प्रदर्शित होणार आहे. आमिरचा हा नवीन चित्रपट शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’नंतर आणि सलमान खानच्या ‘दबंग-२’च्या रिलीजच्या अगोदर काही दिवस प्रदर्शित होत आहे. आणि याच सिनेमासंबंधी आमिर आता भरभरून बोलताना दिसतो.
जेव्हा आपल्या या दोन स्पर्धक ‘खान’चा विषय निघतो तेव्हाही परफेक्शनिस्ट आमिरला स्वत:चं वेगळेपण माहीत आहे, हे प्रेक्षकांच्या लक्षात येतं. आमिर म्हणतो, ‘तीनही ‘खान’मध्ये मी एकटाच असा आहे जो आपल्या मनाला वाटेल तेच करतो. जेव्हा लोक मला ‘इंटेलिजंट’ म्हणतात तेव्हा मला त्याचं वाईट वाटत नाही आणि त्यात काही चुकीचं आहे असंही मला वाटत नाही’
‘पण, हेही पूर्णत: बरोबर आहे असं मी म्हणणार नाही. माझ्या स्वभावानुसार मी जे निर्णय घेतो ते पूर्णत: भावनाप्रधान असतात. मी जे काही करतोय त्याबद्दल तुम्ही मला त्याचं तार्किक कारण विचारलं तर ते माझ्याकडून तुम्हाला मिळेलच असं नाही’ असंही आमिरनं म्हटलंय.
आम्हा तीन ‘खान’च्या तीन फिल्म्स काही कालावधीच्या फरकारनं प्रदर्शित होत आहेत. माझ्या मते, आमच्या तिघांच्याही तीन फिल्म्स वेगवेगळ्या दिवशी प्रदर्शित होत असल्यानं गल्ला जवण्यासाठी तीनही सिनेमांना पर्याप्त वेळ मिळतोय’
यावेळेस आमिर आपल्या मनाचा उदारपणा दाखवत असंही म्हणतोय, ‘की सलमान आणि शाहरुखच्या फिल्म्सही माझ्या फिल्म्सप्रमाणे चांगल्या चालाव्यात असं मला नेहमीच वाटतं’. पाहा... आहे की नाही, आमिर तिनही ‘खान’मध्ये वेगळा!
First Published: Saturday, November 24, 2012, 19:52