Last Updated: Tuesday, June 10, 2014, 09:54
www.24taas.com, वृत्तंस्था, मुंबईअभिनेता इमरान खान आणि अवंतिकाच्या आयुष्यात आज एका छोट्या परीचं आमगन झालंय. इमरानच्या जवळील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी अवंतिकानं एका मुलीला जन्म दिला.
अवंतिका- इमरानचा विवाह 2011मध्ये झाला होता. आपल्या पहिल्या बाळाबद्दल दोघंही उत्सुक होते आणि डिसेंबर 2013मध्ये अवंतिका आई होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.
इमरान एक वडील म्हणून आपली जबाबदारी पार पडण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालाय. त्यानं आपल्या कामातून सुट्टी घेतलेली आहे आणि आणखी काही महिने तो रजेवर असणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 10, 2014, 09:54