अनुष्काला किस, इमरानला फुटला घामटा, Imran Khan felt awkward kissing Anushka Sharma

अनुष्काला किस, इमरानला फुटला घामटा

अनुष्काला किस, इमरानला फुटला घामटा


www.24taas.com, मुंबई


विशाल भारद्वाजचा नवा चित्रपट मटरू की बिजली का मन्डोला सध्या खूपच चर्चेत आहे. यात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता इमरान खान यांच्या काही गरमागरम सीन चित्रीत करण्यात आले आहेत.
लग्न झालेला इमरान कान अनुष्कासोबतच्या किसिंग सीनच्या वेळी फारच घाबरला होता. त्यामुळे दिग्दर्शकाला हा सीन करताना अनेक वेळा रिकेट करावे लागले. अनुष्काला किस करताना इमरानला खूप अस्वस्थ वाटत होते, त्याला घामटाही फुटला होता. इमरान आणि अनुष्काच्या लिपलॉकची चर्चा फारच झाली आहे. तसेच या चित्रपटच्या प्रोमोमध्येही हा किसिंग सीन मोठ्याप्रमाणात दाखविण्यात येते आहे.
अनुष्का आणि इमरान या चित्रपटात प्रथमच काम करीत आहे. या संदर्भात इमरानला विचारण्यात आले त्यावर तो म्हटला. आपल्या ओळखी आणि जवळच्या व्यक्तीला किस करणे सहज असते. मात्र, अनोळखी व्यक्तीला किस करणे खूपच अवघड असते. अनुष्काला मी ओळखत नव्हतो. तिचे चित्रपट पाहिले आहेत. ती एक चांगली कलाकार आहे.

First Published: Friday, December 7, 2012, 16:32


comments powered by Disqus