Last Updated: Sunday, May 11, 2014, 14:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई एका मॉडेलसोबत बलात्कार केल्याच्या आरोपांचा सामना करत असलेल्या अभिनेता इंदर कुमारच्या अडचणी आता आणखी वाढल्यात.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, चिकित्सकांनी केलेल्या चौकशीत संबंधित महिलेवर बलात्कार झाल्याच्या आरोपाला दुजोरा मिळालाय. चिकित्सक चौकशीत आणखीही काही गोष्टी समोर आल्यात, ज्यामुळे घटनेतील क्रूरताही स्पष्टपणे दिसतायत.
सूत्रांच्या माहितीनुसार, 23 वर्षीय मॉडेलच्या शरीरांवर जखमांचे आणि जाळण्याचे निशाणही आहेत. सोबतच तिचा क्रूरपणे शारीरिक छळही करण्यात आलाय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या खांद्यावर आणि गळ्यावर सिगारेटनं चटके दिल्याचे निशाण आहेत. तसंच तिच्या हातांवर चावण्याच्या खुनाही सापडल्या आहे. तसचं चाकूनंही तिच्या शरीरावर जखमा झालेल्या आढळल्या.
दुसरीकडे, इंदर कुमारच्या म्हणण्यानुसार, तो निर्दोष आहे आणि संबंधित महिलेसोबत प्रस्थापित झालेले शारीरिक संबंध तिच्या सहमतीनं झाले होते. ‘मी तिला कोणत्याही पद्धतीनं यासाठी जबरदस्ती केलेली नव्हती. तिनं स्वत:च माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी हे स्वीकार करतोय की मी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले कारण, माझं आणि माझ्या पत्नीचे विचार जुळत नाहीत. पण, मी त्या महिलेचा बलात्कार केलेला नाही’ असं इंदर कुमारनं म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 11, 2014, 14:23