कॅनडामधील रस्त्याला ए आर रेहमानचे नाव, Music Maestro AR Rahman Gets A Street Named After Him In Canada

कॅनडामधील रस्त्याला ए आर रेहमानचे नाव

कॅनडामधील रस्त्याला ए आर रेहमानचे नाव
www.24taas.com, वृत्तसंस्था, हैदराबात

भारती संगितकार ए. आर. रेहमानचा कॅनडामध्ये नुकताच सन्मान करण्यात आला आहे. कॅनडामधील एका रस्त्याला त्याचे नाव दिल्याची माहिती ट्विटर स्वत: रेहमान दिली आहे.

कॅनडातील मरखम शहरातील एका रस्ताचे नामकरण `अल्ला-रखा रेहमान स्ट्रीट` असे करण्यात आले आहे. याबाबत सोशल नेटवर्किंग साइटवरून स्वत: रेहमानने ही बातमी दिली आहे. ही माहिती देताना त्याने आपले एक छायाचित्र त्यांने ट्विटरवर अपलोड केले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवानिमित्त कॅनडातील टोरांटो शहरात ४ नोव्हेंबर रोजी एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मरखममधील एका रस्त्याला ए. आर. रेहमान यांचे नाव देत असल्याची घोषणा करण्यात आली. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा, सन्मानांचा मानकरी असलेल्या रेहमानही या गौरवानं भारावून गेला असल्याचे त्याने म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, November 5, 2013, 23:20


comments powered by Disqus