Last Updated: Wednesday, May 28, 2014, 22:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सध्या बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मोबाईलमधून `व्हाटस् अप`च्या साहाय्यानं त्याच्या जवळच्या अनेकांना एक मार्कशीट पाठविली जातेय... ही मार्कशीट आहे त्याच्या मुलीची... इराची...
आमिरचे पाय सध्या जमिनीवर नाहीत... कारण त्याला अभिमान असणारी त्याची मुलगी इरा हिनं दहावीत 89 टक्के गुण मिळविले आहेत. इरानं आयसीएससीच्या बोर्डाच्या परीक्षेत ही कामगिरी केलीय. त्यामुळेच आमिर आपल्या सगळ्या मित्रांना या मार्कशीटचा फोटो काढून पाठवतोय... आता तुम्ही याला शो ऑफ म्हणा किंवा एका पित्याचा आनंद...
आमिरला इरा बोर्डाच्या परीक्षेत चांगली कामगिरी करून दाखवेल याबाबत अगोदरपासूनच खात्री वाटत होती. इरानंही आपल्या वडिलांच्या आशा कायम ठेवत हे यश मिळवलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 28, 2014, 22:21