सोनाक्षी सिन्हा-सलमान खान यांचं बिनसलं?, Is all well between Sonakshi Sinha and Salman Khan?

सोनाक्षी सिन्हा-सलमान खान यांचं बिनसलं?

सोनाक्षी सिन्हा-सलमान खान यांचं बिनसलं?
www.24taas.com, मुंबई

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने सोनाक्षी सिन्हा हिला दबंग या सिनेमातून ब्रेक दिला हे सगळ्यांनाच माहिते आहे. आणि त्यामुळे सोनाक्षीला या इंडस्ट्रीत आपले पाय रोवता आले. मात्र काही सुत्रांच्या मते, अशी माहिती आहे की, आता मात्र दोघांचं नातं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. माहिती मिळते आहे की, या दोघांच्या नात्यात काहीतरी कुरबुरी सुरू आहेत.

सोनाक्षी तसं तर सलमानच्या दबंग - २ मध्येही होती, त्याच्याशी संबंधित अनेक कार्यक्रमात ती त्याच्यासोबत दिसते. मात्र सोनाक्षी आता म्हणते की, मी कोणत्याही कॅम्पशी जोडलेली नाही. सोनाक्षी आणि सलमान यांच्यात पूर्वीसारखा गोडवा राहिला नसल्याचे समजते. अशी काहीतरी बाब आहे, ज्यामुळे ह्या दोघांमध्ये अंतर निर्माण झालं आहे.

यामागचं कारण म्हणजे, सलमानचा लहान भाऊ सोहेल खानने सेलिब्रेटी क्रिकेट लीगमधून सोनाक्षीला बाजूला सारलं आहे. सोहेल खानच्या सेलिब्रेटी क्रिकेट लीगचा चेहरा सोनाक्षी होती, मात्र त्यानंतर तिला बाजूला सारून कंगना राणावतला घेतलं गेलं. मात्र सोनाक्षीचे प्रवक्ता या गोष्टीचे खंडन करीत आहेत. मात्र याबाबत सोनाक्षी आणि सलमान या दोघांनी चुप्पीच साधली आहे.

First Published: Thursday, January 17, 2013, 14:24


comments powered by Disqus