Last Updated: Wednesday, March 6, 2013, 08:59
www.24taas.com, मुंबईपॉर्न स्टार आणि आता सध्याची बॉलिवूडची अभिनेत्री सनी लियॉन आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सनी लियॉन आता देशी ठुमके लावणार आहे... तिचा देसी तडका पाहता येणार आहे.
सनी लियॉनच्या हॉट अदा साऱ्यांनी नेहमीच पाहिल्या आहेत, मात्र सनी लियॉन आता घाघरा-चोली या अस्सल देशी पोषखात दिसणार आहे. तर याच देसी पोषाखात ती देसी तडका देत चांगलीच थिरकणार आहे. सनी लियॉन आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच कोणतं तरी आयटम नंबर करणार आहे.
एकता कपूरचा सिनेमा शूट अॅट वडालामध्ये सनी लियॉन आयटम नंबर करताना दिसणार आहे. देसी गर्लचा हटके लूक सनीला दिसणार तरी कसा.. आणि सनी त्यावर थिरकरणार तरी कशी हे काही दिवसात स्पष्ट होईलच. तिच्यासोबत या आयटम नंबरमध्ये तुषार कपूर आणि जॉन अब्राहमसुद्धा दिसणार आहेत.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची अजूनही सनीला छाप सोडता आलेली नाही. पण आता सनी या आयटम नंबर मधून तिचे जलवे दाखवेल अशी तिच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.
First Published: Wednesday, March 6, 2013, 08:59