Last Updated: Tuesday, September 25, 2012, 12:15
www.24taas.com, मुंबईअक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना कन्यारत्न झाले आहे. आता अक्षय ट्विंकल आणि आरव यांचं तीन जणांचं कुटुंब चार जणांचं बनलं आहे. आरवचं वय वर्षं १० आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्विंकलने मुलीला जन्म दिला आहे. आई आणि मुलगी दोघींचीही प्रकृती चांगली आहे.
काल संध्याकाळपर्यंत अक्षय कुमार आपल्या आगामी ‘ओह माय गॉड’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. तो इव्हेंट सोडून अक्षय कुमार आपल्या पत्नीला भेटण्यासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचला.
काही दिवसांपूर्वी ट्विंकलचे वडील आणि अक्षय कुमारचे सासरे सुपरस्टार राजेश खन्ना यांचं निधन झालं. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी अक्षय- ट्विंकलच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मुलीच्या रुपाने एक नवी सदस्य आली आहे. यामुळे भाटिया आणि खन्ना परिवार आनंदात आहेत.
First Published: Tuesday, September 25, 2012, 12:15