Last Updated: Tuesday, November 13, 2012, 16:52
www.24taas.com, मुंबईमंगळवारी प्रदर्शित झालेल्या `जब तक है जान`ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मॉर्निंग शो देखील हाऊसफुल्ल झाला. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या `जब तक है जान` या चित्रपटाचा मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये शानदार प्रिमीअर शो झाला. `जब तक है जान`च्या प्रिमीअरसाठी बॉलिवूडचे तिन्ही खान अमिर, सलमान आणि शाहरुख उपस्थित होते.
यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा शेवटचा सिनेमा आहे. गेल्या महिन्यात त्यांचे निधन झाले. यश चोप्रांची इच्छा होती की, या चित्रपटाचा प्रिमीअर भव्य-दिव्य व्हावा, त्याप्रमाणेच या प्रिमीअरचे आयोजन करण्यात आले होते. यशराज स्टुडिओमध्ये झालेल्या शानदार प्रिमीअर सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. प्रिती झिंटाने शाहरुखला शुभेच्छा दिल्या.
प्रिमीअरनंतर शाहरुख म्हणाला, `मी जग फिरलो. खूप थिअटर पाहिले पण, यशजींना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीने हे थिएटर सजवले असे मी आजपर्यंत पाहिलेले नाही.`
First Published: Tuesday, November 13, 2012, 15:02