सलमानचा 'जय हो' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या ‘Jai Ho’ teaser: Watch ‘aam aadmi’ Salman Khan roar!,

सलमानचा 'जय हो' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सलमानचा 'जय हो' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला "जय हो" या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दबंग खान सलमाननं खास आपल्या शैलीत या फिल्मच्या प्रमोशनची सुरुवात केली.

सलमान खानच्या जय हो या सिनेमा बाबात सिने इंडस्ट्रितल्या प्रत्येकालाच उत्सुकता होती. एवढच नाही तर त्याचे चाहते ही या सिनेमाच्या प्रतिक्षेत होते. आपल्या तमाम फॅन्सच्या उपस्थितीत सल्लू मियाँनं या फिल्मची पहिली झलक मीडियासमोर आणली.

आधी मेंटल आणि आता जय हो. मेंटल या सिनेमाचं नाव जय हो करण्यामागचं कारण ही सलमाननं या वेळी शेयर केलं. अनेक दिवसांपासून कॉफी विथ करण या शोच्या माध्यमातून सलमान आणि कतरिना बदल अनेक चर्चा रंगत होत्या. या शोमध्ये करिनानं कतरिनाला चक्क वहिनी म्हटलं होतं. या बद्दल विचारल्यावर सलमाननं भलतच उत्तर दिलं.

पुन्हा एकदा सलमाननं आपली दबंगिरी दाखवून दिली. दरम्यान, "मैत्रीसाठी कायपण", असं सध्या सलमान म्हणंण आहे.. आमिरच्या धूम 3 या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये काही अडचणी येऊ नये यासाठी सलमाननं चक्क जय हो या सिनेमाचं प्रमोशन काही दिवसांनी पुढे ढकलंल होतं. एवढच नाही तर त्याच्या बिग बॉस या शोमध्येही तो धूम 3 चं जोरदार प्रमोशन केलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, December 14, 2013, 13:50


comments powered by Disqus