जिया खाननंतर स्टायलिस्टचा संशयास्पद मृत्यू, Jiah Khan`s former stylist Anil Cherian found dead mysteriously

जिया खाननंतर स्टायलिस्टचा संशयास्पद मृत्यू

जिया खाननंतर स्टायलिस्टचा संशयास्पद मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री जिया खान हिचा फॅशन स्टायलिस्ट अनिल चेरियन याचा संशयास्पद मृत्यू झालाय. अनिलचा मृतदेह गोराई समुद्र किनाऱ्यावरील एका बंगल्यातील विहिरीमध्ये आढळून आलाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.

तीन महिन्यांपूर्वी २ जून रोजी आपल्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर चेरियनचा मृतदेह सापडल्यानं अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पोलिसांना गोराई येथील बंगल्याहतून काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत. चेरियन यांच्यासोबत पार्टीत सहभागी झालेल्या लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

अनिल चेरियन याने अभिनेता शेखर सुमनसोबतही अनेक वर्षे काम केले होते. सध्या तो जियाच्या आयुष्यायवर वेधलेल्या ‘बोल्डन बॉलिवूड’ या चित्रपटासाठी स्टायलिस्टचे काम करत होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 10, 2013, 13:12


comments powered by Disqus