Last Updated: Saturday, August 10, 2013, 13:20
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई एक अभिनेता आणि निर्माता म्हणून मिळणारी यशानं जॉन अब्राहमचा उत्साह आता द्विगुणीत झालाय. त्यामुळेच आता गुळगुळीत चेहऱ्यातील आपली माचो इमेज पुसून आणखी काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. आता जॉनच्याही चेहऱ्यावर दाढी-मिशा दिसणार आहेत.
आपल्या आगामी ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात जॉन अब्राहम त्याच्या नवीन लुकमध्ये दाढी-मिशांमध्ये दिसणार आहे. या सिनेमात जॉन एका रॉ एजन्टची भूमिका निभावतोय... जो श्रीलंकेमध्ये सुरू असणाऱ्या दहशतवादी कारवायांसंबंधी तो श्रीलंकेत जातो... आणि कथा पुढे सरकते.
याच घुसखोरीसाठी जॉन अब्राहमला दाढी-मिशा ठेवाव्या लागतात. त्याचा हा लूक काहिसा ‘लूक फॉर अवे’च्या टॉम हॅक्सच्या लुकशी मिळता जुळता दिसतोय.
मद्रास कॅफे हा सिनेमा श्रीलंकेतल्या `लिबरेशन टायगर ऑफ तामिळ`च्या खूनी संघर्षापाठी लपलेल्या राजकारणावर आधारीत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम तामिळांची चुकीची इमेज लोकांसमोर सादर करू शकतो, अशा भीतीनं अगोदरपासूनच हा सिनेमा काही जणांच्या निशाण्यावर आहे.
या सिनेमाची शूटींग केरळमध्ये पार पडलीय. सुजित सरकारचा हा सिनेमा २३ ऑगस्ट रोजी रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, August 10, 2013, 13:20