लग्नाबद्दल जॉन म्हणतो... , john getting married with priya runchal?

लग्नाबद्दल जॉन म्हणतो...

लग्नाबद्दल जॉन म्हणतो...
www.24taas.com, नवी दिल्ली

बिपाशाबरोबर ब्रेक अप झाल्यानंतर जॉन अब्राहम दुसऱ्या एका मुलीबरोबर दिसायला लागला. त्यानं आता तिच्याशी लग्न करण्याचाही निर्णय घेतलाय आणि कधी याचाही विचार त्याच्या मनात घोळतोय.

जॉन एका वर्तमानपत्राशी बोलताना म्हणतो, ‘मी आणि प्रिया रुंचाल एकमेकांवर खूप प्रेम करतो. प्रिया सध्या लंडनमध्ये आहे आणि तिचं शिक्षण ती पूर्ण करतेय. तीचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्ष तरी लागणार आहेत.’

प्रिया आणि जॉनची भेट पहिल्यांदा जिममध्ये झाली होती. प्रियाबद्दल बोलताना जॉन म्हणतो, ‘प्रिया खूप मॅच्युअर मुलगी आहे आणि आम्ही दोघंही आमच्या या नात्याचा आणि प्रेमाचा सन्मान करतो. ती सध्या लंडनमध्ये आहे. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही लग्नाचा विचार करणार आहोत.’

याचाच अर्थ असा की पुढची दोन वर्ष तरी जॉनचा सिंगल राहण्याचाच बेत आहे. यापूर्वी जॉन आणि बिपाशाचं अफेअर नऊ वर्ष सुरू होतं. पण काहीतरी बिनसलं आणि दोघांनी आपापला वेगळा मार्ग निवडला. आत्ता त्यांचं नात एव्हढं फाटलंय की दोघं एकमेकांचं नावही उच्चारत नाहीत.

First Published: Tuesday, February 19, 2013, 08:35


comments powered by Disqus