Last Updated: Wednesday, May 8, 2013, 16:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशुक्रवारी रिलीज झालेल्या शूटआऊट ऍट वडाळा या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे सिनेमाचा अभिनेता जॉन आब्रहम याने खुश होऊन सिनेमाचा दिग्दर्शक संजय गुप्ता याला २४ लाख रुपये किमतीची बाइक भेट म्हणून दिली आहे.
शूटआऊट ऍट वडाळा सिनेमा हिट झाल्यामुळे जॉन आब्रहम भलताच खूश आहे. या सिनेमात त्याच्या अभिनयाला संधी दिल्याबद्दल जॉनने संजय गुप्ताला यामहाची मॅक्स क्रुजर ही मोटर सायकल गिफ्ट केली आहे. या बाइकमध्ये V4 हे इंजिन आहे. या बाइकची किंमत २४ लाख रुपये एवढी आहे. ही बाइक मिळाल्यावर संजय गुप्ताने यासंदर्भात ट्विट केलं आहे, की बाइकबद्दल जॉनचे आभार. या बाइकवरून लाँग ड्राइव्हला जायची मला घाई झाली आहे.
अभिनेत्यापेक्षा जॉन आब्रहम बाइकर म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे. त्याचं बाइकप्रेम सर्वज्ञात आहे. धूम सिनेमातही त्याने बाइकवर भन्नाट स्टंट्स केले होते. त्यामुळे जॉनने संजयला दिलेली महागडी बाइक हा चर्चेचा विषय ठरली आहे. संजय गुप्ताने ट्विटरवर या बाइकचे फोटोही अपलोड केले आहेत.
First Published: Wednesday, May 8, 2013, 16:15