Last Updated: Friday, June 20, 2014, 14:19
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किक’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमातलं पहिलं-वहिलं गाणं नुकतंच यू-टयुबवर प्रदर्शित करण्यात आलंय.
‘दबंग’ सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किक’ ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झाला होता. या ट्रेलरनं केवळ दोन दिवसांत 42 लाखांचा आकडा गाठून एक रेकॉर्डच तयार केला होता... आता, वेळ आहे या गाण्याची... गायक-संगीतकार हिमेश रेशमिया यानं या गाण्याला संगीत दिलंय. तर हे गाणं गायलंय मिका सिंगनं... या गाण्याचे बोल लिहिलेत कुमार आणि शब्बीर अहमद यांनी...
साजिद नाडियाडवाला यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ही अॅक्शन कॉमेडी फिल्म ‘किक’चा ट्रेलर आणि फर्स्ट लूक गेल्या शनिवारी लॉन्च करण्यात आला होता. सलमानचा ‘किक’ येत्या 25 जुलै रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
व्हिडिओ पाहा -
First Published: Friday, June 20, 2014, 14:19