करण जोहर सलमान खानला खूप घाबरतो K Jo afraid of Salman Khan

मी सलमान खानला खूप घाबरतो- करण जोहर

मी सलमान खानला खूप घाबरतो- करण जोहर
www.24taas.com, मुंबई

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर हा सगळ्यांचा चांगला मित्र म्हणून ओळखला जातो. मात्र करण जोहर फिल्म इंडस्ट्रीत एका व्यक्तीला खूप घाबरतो. ती व्यक्ती म्हणजे बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान…

`झलक दिखला जा` आणि `बिग बॉस ६` मध्ये सलमान खान आणि करण जोहर एकत्र दिसले होते. एका रेडिओ शोमध्ये करण जोहरने मान्य केलं, की शाहरुख खानचा दुश्मन मानला जाणाऱ्या सलमान खानला आपण खूप घाबरतो.

करणने सांगितलं. “माझा कार्यक्रम ‘लिफ्ट करा दे’मध्ये जेव्हा सलमान खान आला होता, तेव्हा मी काळा सूट घालून तयार होतो. तेव्हा सलमान मला म्हणाला, की तो माझ्याबरोबर बसणार नाही. सलमान खान कार्यक्रमामध्ये खाली जमिनीवर बसला आणि मलाही त्याच्यासोबत जमिनीवर बसायला त्याने भाग पाडलं.”

करण म्हणाला, की सलमान असं म्हणाल्यावर मी खूप घाबरलो. मला माहित नाही की सलमान खानला मी तका का घाबरतो. आम्ही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आमच्या कुटुंबांचेही एकमेकांशी चांगले संबंध आहेत. तरीही मी सलमान खान समोर आल्यावर घाबरून जातो.

First Published: Tuesday, October 30, 2012, 09:14


comments powered by Disqus