शाहरुखच्या नवजात मुलगा अबरामवर काजोल फिदा, Kajol finds Shah Rukh Khan`s baby AbRam cute

शाहरुखचा नवजात मुलगा अबरामवर काजोल फिदा

शाहरुखचा नवजात मुलगा अबरामवर काजोल फिदा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवुड अभिनेत्री काजोलला आपला मित्र अभिनेता शाहरुखचा नवजात मुलगा अबराम खुपच सुंदर वाटला. या मुलाला २७ मे रोजी एका सरोगेट आईने जन्म दिला होता. एका कार्यक्रमात काजोलने सांगितले की, मी शाहरुखला अबरामच्या जन्माबद्दल शुभेच्छा दिल्या आणि स्वतः अबरामला भेटलेही. तो खूपच सुंदर आहे. माझे आशीर्वाद आणि प्रेम त्यासमवेत कायम राहील असेही काजोलने सांगितले.


‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘गुप्त’, ‘कुछ-कुछ होता है’ आणि ‘फना’ सारख्या आठवणीत राहिलेल्या चित्रपटात काम केलेल्या काजोलने अजय देवगणशी लग्न आणि मुलं झाल्यावर चित्रपटात काम करणे सोडले होते. पण दुसरी इनिंग सुरू करताना ती करण जोहरच्या ‘वी आर फॅमली’ या २०१० मध्ये प्रदर्शीत झालेल्या चित्रपटात दिसली होती. आता पुन्हा ती चित्रपटात काम करण्यास इच्छुक आहे. पण ती एका चांगल्या प्रस्तावाच्या प्रतिक्षेत आहे.

आता मी माझ्या आयुष्यात खूप खूश आहे सध्या मी माझ्या मुलांसोबत वेळ घालवत आहे. भविष्यात मी एखादा चित्रपट करणार असेल तर त्यासाठी माझ्याकडे एक चांगला उद्देश असला पाहिजे. या सर्व प्रक्रियेत मी मुलांकडे दुर्लक्ष करणार नाही. चित्रपट चांगला असला पाहिजे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 17, 2013, 19:16


comments powered by Disqus