यश चोप्रांच्या वाढदिवसाचे काजोलला नाही निमंत्रण!Kajol not invited by the Chopras yet again?

यश चोप्रांच्या वाढदिवसाचे काजोलला नाही निमंत्रण!

यश चोप्रांच्या वाढदिवसाचे काजोलला नाही निमंत्रण!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता अजय देवगणने २०१२ साली केलेल्या तक्रारीबद्दल यश चोप्रा बॅनरने अजूनही त्याला माफ केलेल दिसत नाही. त्यांच्यातील वादाचा त्रास सहन करतेय यश चोप्रा बॅनरची एक काळची आवडती अभिनेत्री आणि अभिनेता अजय देवगणची पत्नी काजोल!

२७ सप्टेंबरला दिवंगत निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रांचा जन्मदिवस मोठया उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा करण्यात येणार आहे. यासाठी यश चोप्रांच्या कंपूतील सर्व आघाडीच्या अभिनेत्री सज्ज आहेत. मात्र यश चोप्रा बॅनरची एकेकाळची आवडती अभिनेत्री काजोल हिला या कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, या कार्यक्रमात यश चोप्रांच्या कंपूतील सर्व आघाडीच्या अभिनेत्री रॅम्प वॉक करणार आहेत.

परंतु, अभिनेत्री काजोलला या कार्यक्रमाचे साधे निमंत्रण देखील नाही. त्यामुळे काजोल या कार्यक्रमात सामील होणार नाही.
‘फना’ आणि ‘दिलवाले दुल्हनियॉं लें जायेंगे’ काजोलचे हे दोन ब्लॉकबस्टर सिनेमे यश चोप्रांच्या बॅनरचेच. यश चोप्रांनी स्वतः कधी काजोलला दिग्दर्शीत केलेल नाही.

यश चोप्रांच्या पॉलीसीमुळेच आपल्यास सिनेमाघर कमी मिळाले, ही अजय देवगणची तक्रार अजूनही प्रलंबित असल्यांच या सूत्रांनी सांगितलं.

काजोलच्या ऐवजी अभिनेत्री परिणीती चोप्रा रॅम्प वॉक करणार असल्याच देखील सूत्रांनी सांगितलं.

‘जब तक है जान’च्या प्रिमीयरवेळीही काजोलला यश चोप्रा बॅनरने निमंत्रीत केले नव्हते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 23, 2013, 17:55


comments powered by Disqus