कमल हसनचं मतदारांना आवाहन kamal hasan appeal to voter

कमल हसनचं मतदारांना आवाहन

कमल हसनचं मतदारांना आवाहन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेते कमल हसन यांनी एका व्हिडिओमधून मतदारांना केले आहे, मतासाठी पैसे घेऊन तुम्ही तुमचे भविष्य विकू नका, असे आवाहन अभिनेते कमल हसन यांनी केले आहे.

तमिळनाडूमध्ये निवडणूक आयोगाने "कॅश फॉर व्होट`च्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. याविषयी निवडणूक आयोगाने नुकताच एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

या व्हिडिओमधून पैसे घेऊन तुम्ही तुमचे मत विकू नका, असे आवाहन कमल हसन करत आहेत.

कमल हसन म्हणाले, "कोणता प्रतिनिधी निवडून द्यायचा, हा महत्त्वाचा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे. पैसे घेऊन तुम्ही तुमचे भविष्य विकू नका. योग्य निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात मतदान करा.

मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. देश चालविण्यासाठी योग्य प्रतिनिधीची गरज आहे.` असंही कमल हसनने स्पष्ट केलं आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 19, 2014, 21:02


comments powered by Disqus