Last Updated: Friday, November 9, 2012, 20:34
www.24taas.comशर्लिन चोप्रा पुन्हा एकदा आपल्या कारनाम्याने प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करीत आहे. `प्लेबॉय` या अॅडल्ट मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करणाऱ्या शर्लिन चोप्राच्या आगामी `कामसूत्र 3डी` चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज करण्यात आला. बॉलिवूडमध्ये सध्या या चित्रपटाची चर्चा जोरात सुरु आहे.
`कामसूत्र 3डी`च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे हॉट व न्यूड सीन भारतात शूट न करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी हे सीन हॉलिवूडमध्ये शूट करण्याचे ठरवले आहे.
चित्रपटाचे निर्माते भारतात न्यूड सीन शूट करून कोणाच्याही भावना दुखावण्यास आणि सरकारी नियमांच्या विरोधात जाण्यास इच्छुक नाहीत. ऐकण्यात असेही आले आहे की, चित्रपटातील कलाकारांनाही भारतात शुटिंग करण्यात अडचण वाटत होती. त्यामुळे निर्मात्यांनी विदेशात शुटिंग करण्याचे ठरवले आहे.
First Published: Friday, November 9, 2012, 20:25