`कामसूत्र ३डी`चे दिग्दर्शक बनवणार मोंदींवर `नमो ४डी``Kamsutra 3D` film Director now Direct Film on M

`कामसूत्र ३डी`चे दिग्दर्शक बनवणार मोंदींवर `नमो ४डी`

`कामसूत्र ३डी`चे दिग्दर्शक बनवणार मोंदींवर `नमो ४डी`
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जरा लक्ष देवून वाचा... कारण या वर्षातली सर्वात हॉट न्यूज थंडीच्या या महिन्यात पुढं आलीय. हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडाचा आगामी चित्रपट `कामसूत्र ३डी`चे दिग्दर्शक रुपेश पॉल आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट बनवणार आहेत.

रुपेश पॉल नरेंद्र मोदींच्या जीवनावर `नमो ४डी` हा चित्रपट बनवणार आहेत त्यासाठी दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव निश्चितही करण्यात आलंय. रुपेश पॉल याबाबत म्हणाले, हा चित्रपट एक पॉलिटिकल थ्रिलर असेल. चित्रपटाची कथा लिहीण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं असल्याचं पॉल यांनी सांगितलं. चित्रपटात रोमान्सचा पण तडका असेल, ज्याचा मोदींच्या रिअल लाईफशी काहीही संबंध नाहीय. हा खूप उत्कृष्ट चित्रपट असेल, प्रेक्षकांना यातून प्रेरणाच मिळेल, असंही पॉल म्हणाले.

एका मासिकाला पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटातले कलावंत येत्या सात दिवसांत फायनल होणार आहेत. तर येत्या १५ फेब्रुवारीपासून चित्रपटाचं शूटिंग सुरू होईल. चित्रपटात मोदींचं महात्म्य नसेल तर सध्याच्या राजकीय परिस्थितीत मोदी किती प्रभावशाली आहेत, हे दाखवण्यात येईल. इतर चित्रपटांप्रमाणेच यात रोमान्स, अॅक्शन आणि गाणीही असतील.
`नमो ४डी`चे सेल्स एजंट मितेश पटेल आहेत तर प्रोजेक्ट डिझायनर सोहन रॉय. वादग्रस्त चित्रपट `डॅम ९९९`चे रॉय हे दिग्दर्शक आहेत. तामिळनाडूत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आलीय. कारण यात मुल्लापेरियार प्रकल्पावरुन केरळ राज्याची बाजू घेतलेली आहे.

`नमो ४डी`चे असोसिएट निर्माता मितेश पटेल यांचं म्हणणं आहे की, `कामसूत्र ३डी`चा दुसरा ट्रेलर पाहिल्यानंतर रुपेश पॉल यांना हायर केलं गेलंय. तेव्हा आता या चित्रपटाद्वारे लवकरच बॉलिवूडचे नामवंत कलाकार आपल्या समोर येणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 24, 2014, 09:17


comments powered by Disqus