`क्वीन` बॉक्स ऑफिसची राणी, आतापर्यंत २१ कोटींची कमाई! Kangna`s Queen First Week Collection At Box Of

`क्वीन` बॉक्स ऑफिसची राणी, आतापर्यंत २१ कोटींची कमाई!

`क्वीन` बॉक्स ऑफिसची राणी, आतापर्यंत २१ कोटींची कमाई!

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

कंगना राणावतच्या `क्वीन` चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २१ कोटी रुपयांची कमाई केलीय. नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या `बेवकुफियाँ`लाही मागे टाकलंय. आयुष्मान खुरानाच्या बेवकुफियाँनं ४.७४ कोटी रुपयांची कमाई केलीय.

`क्वीन` चांगलीच कमाई करत आहे. अजूनही अनेक सिनेमागृहात क्वीन हाऊसफुल्ल आहे. गेल्याच शुक्रवारी प्रदर्शित झालेला `बेवकूफियाँ`ही काही क्वीनवर छाप पाडू शकला नाहीय`, असं मल्टिमीडियाचे राजेश थाडानी यांनी म्हटलंय.

विकास बहल निर्मित क्वीन सात मार्चला प्रदर्शित झाला. त्याचदिवशी माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांच्या वादात येऊनही प्रदर्शित झालेला `गुलाब गँग`लाही क्वीनने मागे टाकले आहे. तसंच क्वीन प्रदर्शित झाल्यानंतर यश राज फिल्म कंपनीचा `बेवकूफियाँ` १४ मार्चला प्रदर्शित झाला. मात्र त्याने जास्त प्रभाव टाकला नाहीय.

`बेवकूफियाँ`ने पहिल्या आठवड्यात ४.७१ कोटी रुपयांची कमाई केल्याचे चित्रपट समीक्षक तरन आदर्श याने माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटवर ट्विट केलय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Monday, March 17, 2014, 12:45


comments powered by Disqus