श्रीदेवीची मुलगी करण जोहरच्या चित्रपटात Karan Johar to launch Sridevi`s daughter Jhanvi?

श्रीदेवीची मुलगी करण जोहरच्या चित्रपटात

श्रीदेवीची मुलगी करण जोहरच्या चित्रपटात

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

आलिया भट्ट नंतर चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूीडमध्ये आणखी एक नवीन चेहरा आणत आहे. बॉलिवूडची मिस हवा हवाई श्रीदेवी हिची मुलगी जान्हवीला आपल्या चित्रपटात संधी देणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तो जान्हवीची बॉलिवूड एंट्री मोकळी करतोय.

करण जोहर आणि कपूर कुटुंबियामध्ये खूपच चांगली मैत्री आहे. त्यामुळे करणने जान्हवीला बॉलिवूडमध्ये आणण्याचे आधीपासूनच ठरवले होते. त्यासाठी जान्हवी डान्स आणि शब्दातील उच्चार शिकत आहे. तसेच या मोठ्या ऑफर्ससाठी जान्हवीसुद्धा पूर्णपणे तयारीला लागलीय.

मात्र, जान्हवीने पहिले अभ्यासावर लक्ष द्यावे. नंतर बॉलिवूड करिअर करावे, असे तिची आई श्रीदेवी हिने करणला सांगितलंय. एवढचं नाही तर श्रीदेवीप्रमाणे जान्हवीलाही दक्षिण चित्रपटाचे ऑफर्स आल्या आहेत. ज्यामध्ये चित्रपट निर्माता राम चरण तेजा आणि नागार्जुनच्या मुलगा नागा चैतन्यसोबत जान्हवी दिसेल.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 29, 2014, 12:38


comments powered by Disqus