करीनाने चुकीच्या `खान`शी लग्न केलं- सलमान खान Kareena Choase a Wrong Khan- Salman

करीनाने चुकीच्या `खान`शी लग्न केलं- सलमान खान

करीनाने चुकीच्या `खान`शी लग्न केलं- सलमान खान
www.24taas.com, मुंबई

सलमान खान आणि करीना कपर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकमेकांसोबत काम केलंय. मात्र `दबंग २`मध्ये एका आयटम नंबरच्या निमित्ताने दोघे एकत्र आले आणि पुन्हा त्यांनी धमाल उडवून दिली.

‘बिग बॉस ६’मध्ये करीना कपूरने सलमान सोबत त्याच्याच आगामी दबंग २ सिनेमातील फेव्हिकॉल से या गाण्यावर डान्स केला. सलमान खाननेही करीनासोबत नेहमीप्रमणेच धमाल डान्स केला. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच नव विवाहीत करीनाला बोलावताना ‘करीना कपूर-खान’ अशी तिची ओळख करून देण्यात आली. त्यावेळी सलमान खान तिला थट्टेने म्हणाला, की तू चुकीच्या ‘खान’शी लग्न केलंस.

पतौडीच्या बेगम करीनाने आत्ताप्रय़ंत शाहरुख, सलमान, आमिर आणि सैफ अली खान या टॉपच्या खान मंडळींसोबत काम करून नंबर १च्या अभिनेत्रीचं पद मिळवलं आहे. एकुणच तिचं खान कनेक्शन फेव्हिकॉलइतकंच मजबूत दिसत आहे. त्यामुळेच अद्याप अविवाहीत असलेल्या आणि करीनाचा जवळचा मित्र असणाऱ्या सलमानने तिला चुकीच्या खानशी लग्न केल्याचं म्हटलं.

First Published: Sunday, December 2, 2012, 16:46


comments powered by Disqus